Rohit Pawar | त्यांना वाटाघाटी करायच्या होत्या?, विजय शिवतारेंच्या बदतल्या भूमिकेवर रोहित पवारांनी उपस्थित केले प्रश्न

Rohit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघावरुन शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्ला चढवला होता. अजित पवार माणुसकी नसलेले व्यक्ती आहेत, त्यांना प्रचंड गुर्मी आहे असं सांगत या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना पराभूत करत सूड पूर्ण करणार असल्याची भूमिका विजय शिवतारे यांनी घेतली होती. मात्र काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीनंतर शिवतारेंनी माघार घेतल्याचे जाहीर केले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिवतारेंवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

भोर येथी पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले, माघार ते भूमिकेबद्दल घेऊ शकतात, मात्र त्यांनी केलेली भाषण, टीका ही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. आमचा विरोध ते करू शकतात कारण ते आज भाजपसोबत सत्तेत आहेत. पण अजित दादा सत्तेत असूनही ते अजित दादांवर टीका करत होते, मग हे त्यांना कोणी बोलायला लावलं की त्यांना वाटाघाटी करायच्या होत्या, प्रेशर आणायचं होतं, वातावरण निर्माण करायचं होतं? आणि वाटाघाटी झाल्यानंतर माघार घ्यायची ही तुमची भूमिका होती का?, असे प्रश्न यावेळी रोहित पवारांनी उपस्थित केले.

आज भूमिका बदलणाऱ्या नेत्यांवर लोकांचा विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती आहे. भाजपसोबत जे पक्ष आहेत, त्यांना वाटतय ते सत्तेत आहेत, पण ते लोकसभेपुरतेच सत्तेत राहतील, विधानसभेत गेल्यानंतर कदाचित त्यांना एकही जागा मिळणार नाही, असेही यावेळी रोहित पवारांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल