Sanjay Raut  | महादेव जानकरांसारखे लोक जिथे खायला मिळतं तिथे ते जातात

Sanjay Raut  | लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे अशी पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे.  या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी बैठकांचा धडाका सुरु असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरु आहे.

यातच महाविकास आघाडीच्या वाटेवर असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आपली भूमिका बदलली आहे. महादेव जानकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार यांची भेट घेत आपण महायुतीतच राहणार असल्याचे जाहीर केले. तसेच यावेळी महादेव जानकर यांना लोकसभेसाठी एक जागा देण्यात येईल, असा निर्णयही घेण्यात आला.

महादेव जानकरांसारख्या लोकांना कोणतीही विचारधारा नसते, जिथे खायला मिळतं तिथे ते जातात अशा शब्दात संजय राऊतांनी (Sanjay Raut ) जानकरांवर निशाणा साधलाय. काही दिवसांपूर्वी महायुतीत नसल्याचं म्हणणारे महादेव जानकर स्वगृही परतलेत. मविआकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशीही शक्यता होती, मात्र जानकर महायुतीच्या गोटात दाखल झालेत, त्यावर राऊतांनी घणाघात केलाय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय