LokSabha Elections | ठरलं तर मग …! ‘या’ तारखेला जाहीर होणार भाजपचे महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार  

LokSabha Elections | केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, काल रात्री उशीरा त्यांनी मुंबईत महायुतीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शहा यांचं मुंबई विमानतळावर स्वागत केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. केंद्रिय मंत्री शहा यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या जागावाटपाबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. आज महायुतीतले तिनही घटक पक्ष आपल्या आघाडीची औपचारिक घोषणा करतील असा अंदाज आहे.

दरम्यान, भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Elections) 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. परंतु महाराष्ट्रातील जागा वाटप न झाल्यामुळे त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यानंतर जागा वाटपाचा तिढा अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर सुटल्याचे समजते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

यामुळे येत्या 7 मार्चला भाजपकडून दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या यादीत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान