‘केवळ सुखवाह घोषणा हे आमचे ध्येय नाही… हे बळीराजाचे सरकार आहे’ – धनंजय मुंडे

Dhananjay Munde- ‘केवळ सुखवाह घोषणा हे आमचे ध्येय नाही… दिवसरात्र शेतकरी हा आमच्या चिंतनाचा विषय आहे… त्यांना नियतीवर सोडणाऱ्यांचे राज्य गेले… आता देण्याची नियत असलेल्यांचे सरकार आहे… हे आमचे नाही, महायुतीचेही नाही… हे बळीराजाचे सरकार आहे… अशा शब्दात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात विरोधकांना ठणकावून सांगितले.

नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेत उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या चर्चेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या चुकीच्या माहितीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना खडेबोलही सुनावले.

दीड वर्षाच्या काळात १४ हजार ८५१ कोटी रुपये खर्च मदत व पुनर्वसन विभागाने केला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये तर दोन हेक्टरपर्यंत यासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद याचा लाभ ५ लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. या संकटकाळामध्ये गारपीठीमुळे, अतिवृष्टीमुळे पायाभूत सुविधा कोलमडली आहे, त्याठिकाणी पंचनामे करुन तिथे मदत करण्याचा निर्णय पाच वर्षासाठी कर्ज बिगरव्याजी देऊन त्याचे व्याज सरकार भरणार याबाबतची योजना तयार होत आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना देशात किंवा राज्यात कधी बळीराजाच्या हिताची करण्यात आली नव्हती असेही धनंजय मुंडे यांनी जाहीर केले.

अधिवेशन कालावधीत अडचणीत असलेल्या बळीराजाचे प्रश्न आमदार उपस्थित करत आहेत. या राज्यातील बळीराजाची जबाबदारी कृषीमंत्री म्हणून खांद्यावर आली त्याचवेळी बळीराजावर नैसर्गिक संकट उभे राहिले. त्या नैसर्गिक संकटातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी जबाबदारी येऊन पडली आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

पीक विमा योजना, नमो किसान सन्मान योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आपत्ती काळात द्यायची मदत, शेतीमालाला भाव, शेतीसाठी सिंचन, वीज, कृषी व इतर विभागाच्या योजनांबद्दल सदस्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.

पहिल्यांदा राज्यसरकारने एखादी योजना बळीराजासाठी आणावी आणि ती योजना आणल्यानंतर त्या योजनेचे विरोधी पक्षाच्या बाकावरून स्वागत होण्याऐवजी त्या योजना यशस्वी झाल्यामुळे अस्वस्थता निर्माण व्हावी ती योजना म्हणजे एक रुपयातील पीक विमा योजना होय… मात्र समोरच्या बाकावर एवढी अस्वस्थता कधीही पाहिली नव्हती. असे अस्वस्थ होण्याऐवजी सरकारचे अभिनंदन आणि आभार मानले असते तर बळीराजानेसुध्दा आपले आभार मानले असते असेही धनंजय मुंडे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

पीक विमा योजनेबाबतचे दाखले देऊन विरोधी पक्षनेत्यांनी या सदनाचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. आणि विरोधी पक्षनेते दानवे यांनी वनवे लक्ष वेधून घेतले. हे लक्ष वेधून घेताना जे दाखले दिले (मीही विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे.) आपण कुठलीही माहिती घेतो त्यावेळी विरोधी पक्षनेत्याचे एक कर्तव्य असते की एकतर्फी नाही दुतर्फी नाही तर पाचतर्फी बरोबर करून घ्यावी लागते. त्यावेळीच सदनात उभं राहून बोलता येते. कारण सदनात बोलल्यानंतर युटर्न नसतो तर दिलगिरीच व्यक्त करावी लागते, खंत व्यक्त करावी लागते त्यामुळे बळीराजाचे एक उदाहरण देऊन पीक विमा संदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी लक्ष वेधून घेण्याचे काम केले त्या दिलीप वामन राठोड या शेतकऱ्याच्याबाबतीत अतिशय उद्विग्न होऊन ५३ रुपये पीक विमा मिळाला आहे आणि त्या ५३ रुपयांसाठी पोलीस संरक्षण मागितले. त्या दिलीप वामन राठोड या शेतकऱ्याचे आभार आणि सत्कार तर केलाच पाहिजे. पण त्याची व्यथा इथे मांडली त्याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आभार मानायला हवेत असे सांगतानाच यातील वस्तुस्थिती काय आहे ही वस्तुस्थिती सदनात अर्धवट मांडली. या दिलीप राठोडने कॉटनसाठी ०.८ हेक्टर जमीनीवर दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी त्याच्या अकाऊंटवर १४१९ रुपये जमा आहेत. मात्र हे पैसे दानवेना दिसले नाहीत त्यांना वनवे फक्त ५३ रुपये दिसले. त्या दिलीप राठोड यांचा आयडी नंबर (९३७८७६९८,९३७८७६९८)हे दोन्ही आयडी काय तर कापसाचा विमा तर दुसरा सोयाबीनचा विमा भरलेला आहे. कापसाच्या विम्यासाठी त्याला १४१९ रुपये मिळाले आहेत. तर सोयाबीनसाठी त्याला ५३ रुपये मिळाले आहेत. हे ५३ सुध्दा हजार रुपये मिळावेत असे सरकारचे धोरण आहे परंतु हे एक मिळून काढले तर त्याला १४७२ रुपये मिळाले आहेत.परत अशी चूक विरोधी पक्षनेत्याकडून सरकारवर टिका करण्याची होणार नाही असेही धनंजय मुंडे म्हणाले.

अतिमहत्वाकांक्षी योजना ज्यावेळी राज्यावर असे दुहेरी नैसर्गिक संकट आले आणि ज्यावेळी शेतकरी अडचणीत आला त्यावेळी अशा नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन वित्तमंत्र्यांनी पंचामृत अर्थसंकल्प सादर करत असताना एक रुपयाची पीक विमा योजना सुरू केली त्या देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील बळीराजाच्यावतीने धनंजय मुंडे यांनी यावेळी आभार मानले.

ही योजना आणली नसती तर शेतकऱ्यांना स्वतः च्या खिशातून आपला कापसाचा, सोयाबीनचा उडीद, मूग, तूर या सगळयाचा विमा भरावा लागला असता. शेतकऱ्यांचे पैसे देशाच्या इतिहासात पीक विमा लागू झाल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या हिश्याचे पैसे या राज्यसरकारने भरले आणि त्याचाच फायदा आज याठिकाणी सर्वाधिक देशात यावर्षीच्या खरीपच्या पीक विमा लागू होण्यामध्ये झाला असेल तर या महाराष्ट्रात झाला हे अभिमानाने कृषीमंत्री म्हणून सांगायला मला कमीपणा वाटणार नाही असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

पीक विमा योजना लागू करताना कोणते निकष असतात आणि कोणत्या जिल्हयात किती सर्वेक्षण झाले व किती रक्कम वाटप झाली याची आकडेवारीही धनंजय मुंडे यांनी सभागृहात दिली.

विरोधी पक्षनेते तुम्ही योजना तरी समजून घ्या… तुम्हाला बरेच दिवस झाले आहेत विरोधी पक्षनेते होऊन… असे ठणकावून सांगतानाच पीक विम्यामध्ये २५ टक्के अग्रीम द्यायचा कायदा केंद्राने स्वीकारलेला त्यात तरतूद आहे. त्या २५ टक्के अग्रीमाबाबत इतिहासाने नोंद घ्यावी एवढी मदत यावर्षी या राज्याच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये या पीक विम्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील बळीराजाला झाली आहे असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सन १९-२० मध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या लाभार्थ्यांची संख्या शून्य शून्य आहे तर नुकसान भरपाई मिळाली शून्य… २०-२१ ला लाभार्थ्यांची संख्या १ लाख ३५ हजार भरपाईची संख्या २१ कोटी… २१-२२ मध्ये लाभार्थ्यांची संख्या १२ लाख ६९ हजार आणि नुकसान भरपाई ४५१ कोटी रुपये… २२-२३ मध्ये लाभार्थ्यांची संख्या १७ लाख ९३ हजार आणि नुकसान भरपाई ६६६ कोटी रुपये… २३-२४ मध्ये लाभार्थ्यांची संख्या ५२ लाख आणि नुकसान भरपाई २ हजार २०६ कोटी… म्हणजे याचा अर्थ विरोधी पक्षनेते लक्षात येतोय का ? असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.

तो काळ वेगळा होता म्हणून पेरणी झाली नव्हती असं होतं का? … तो काळ वेगळा होता याचा अर्थ पाऊस पडला नाही असा होता का? … तो काळ वेगळा होता याचा अर्थ खरीप आणि रब्बी पिकात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला नव्हता का? … तो काळ तसा होता म्हणून पीक विमा नव्हता का? … पंचनामे होत नव्हते का? … अशा प्रश्नांची सरबत्ती करत त्यावेळी केलेले पंचनामे या पीक विमा कंपन्यांनी ग्राह्य धरले पाहिजे होते आम्ही हे सांगितलेही होते. मागील चार वर्षांची आकडेवारी काढली तर ११०० कोटी रुपये पीक विमा मिळाला आहे आणि या वर्षाची फक्त अग्रीमची आकडेवारी ही २ हजार २०६ कोटी रुपये असून त्यापैकी १७७५ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. आणि ४३१ कोटी रुपये या आठवडाभरात वाटप होऊन जाईल असेही धनंजय मुंडे यांनी जाहीर केले.

आतापर्यंत मागील सात वर्षांत ११३९ कोटी आणि यावर्षी २२०६ कोटी रुपये हा फरक लक्षात घ्या… आतापर्यंत एकवीस दिवसाचा खंड प्रमुख ट्रीगर म्हणून वापरला जात होता यावर्षी हा ट्रीगर फक्त वापरला असता तर या राज्यातील चारशे महसूल मंडळेच विम्याच्या लाभार्थ्यांसाठी लागू झाले असते आणि जवळ जवळ २ हजार महसूल मंडळे त्यांना पीक विमा लागू झाला नसता. पण केंद्रसरकारच्या नियमावलीमध्ये अधिक बाबी वापरल्या गेल्या म्हणून आपल्या ५२ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला हेही धनंजय मुंडे यांनी नमूद केले.

नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार एकनाथ खडसे, आमदार सुरेश धस, आमदार प्रज्ञा सातव, आमदार अरुण लाड, आमदार अनिकेत तटकरे, आमदार अमोल मिटकरी, आमदार अनिल परब यांनी सहभाग झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन; पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Sunrisers Hyderabad Full Squad: सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संघ,यंदा पॅट कमिन्सपासून हे खेळाडू संघाचा भाग बनले