Eknath Shinde | एकनाथ शिंदेंनी अमित शाहंकडे नेमकी काय मागणी केली? जाणून घ्या किती जागा मागितल्या?

Eknath Shinde | केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, काल रात्री उशीरा त्यांनी मुंबईत महायुतीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शहा यांचं मुंबई विमानतळावर स्वागत केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. केंद्रिय मंत्री शहा यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या जागावाटपाबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. आज महायुतीतले तिनही घटक पक्ष आपल्या आघाडीची औपचारिक घोषणा करतील असा अंदाज आहे.

दरम्यान, सत्तेत तिघेही एकत्र असले, तरी सध्याच्या परिस्थितीत जागा वाटपाचा तिढा सोडवण हे महायुतीमधील मुख्य आव्हान आहे.यातच काल रात्री उशिरा अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. तब्बल 40 मिनिटं ही बैठक सुरू होती. आपल्या पक्षाला लोकसभेच्या 18 जागा मिळाव्यात यासाठीही एकनाथ शिंदे आग्रही होते.

राज्यात आपण उठाव केलाय आणि सर्व आमदार खासदार सोबत घेऊन पक्ष वाढवत असल्याचंही शिंदे म्हणालेत. निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या सर्व 13 विद्यमान खासदारांना तिकीट द्या, अशी आग्रही मागणी एकनाथ शिदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान