प्लेऑफच्या वाटेवर असलेल्या सीएसकेला सोडून चाललाय ‘हा’ १७ हजार धावा करणारा क्रिकेटर, धोनीची वाढलीय चिंता!

धोनीचा (MS Dhoni) संघ चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) अद्याप आयपीएल 2023 च्या प्लेऑफचे (IPL PlayOffs) तिकीट मिळालेले नाही. 13 सामन्यांनंतर सीएसकेचे 15 गुण आहेत आणि ते पाँईट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. थेट प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी धोनीच्या संघाला अंतिम सामना जिंकावा लागेल. याआधी एका अनुभवी फलंदाजाबद्दल वाईट बातमी येत आहे. जरी संघ प्लेऑफमध्ये पोहोचला तरी तो प्लेऑफचे सामने खेळू शकणार नाही.

इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) हा बहुतांश काळ दुखापतीशी झुंजत होता. आयपीएलच्या या मोसमात ज्या सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली, त्या सामन्यांमध्ये तो प्रतिभेला न्याय देऊ शकला (Ben Stokes Ruled Out Of IPL) नाही. आता असे समजत आहे की, बेन स्टोक्स प्लेऑफपूर्वी इंग्लंडला रवाना होणार आहे. दुखापतीमुळे तो आयपीएल 2023 मध्ये फक्त 2 सामने खेळू शकला. मात्र, या काळात त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही. तो 8 च्या सरासरीने केवळ 15 धावा करू शकला आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.

जरी त्याचा एकूण रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने फर्स्ट क्लास, लिस्ट-ए आणि टी-20 क्रिकेट यामध्ये 17 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत आणि 500 ​​हून अधिक बळी घेतले आहेत. त्यामुळे प्लेऑफमध्ये धडक मारल्यास सीएसकेला बेन स्टोक्सची कमी जाणवेल.