लपवाछपवी होणार सुरु? तेलंगणात काँग्रेसकडून लग्झरी बसेस तयार, आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार

Election Result 2023 Live : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगण या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला काही वेळापूर्वीच, आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगानं मिझोरम विधानसभेच्या मतमोजणीच्या वेळापत्रकात बदल केल्यानं तिथं आज ऐवजी उद्या मतमोजणी होणार आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, भाजपने राजस्थानात, मध्य प्रदेशात मोठी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, एक्झिट पोलने छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. परंतु सध्याच्या ट्रेंडवरून भाजप काँग्रेसपेक्षा पुढे आहे. तेलंगणामध्ये (Telangana Assembly Election Results 2023) मात्र काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट होऊ लागताच तेलंगणामधील राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे प्रारंभिक कौल येताच काँग्रेस सतर्क झाली आहे. हैदराबादमध्ये काही लग्झरी बसेस तयार ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, सर्व विजयी आमदारांना लगेच हॉटेलमध्ये हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते स्पष्ट बहुमत असल्यामुळे आम्हाला चिंता वाटण्याचं कारण नाही, अशी भूमिका मांडत असले, तरीही कोणताही धोका पत्करण्यासाठी काँग्रेस नेतेमंडळी तयार नसल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे.

दरम्यान, तेलंगणातील विजयी आमदारांना खरंच हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी हलवलं जाणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच कर्नाटकमधील काँग्रेसचे मंत्री रहीम खान यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “जर तशीच वेळ आली, तर हाय कमांड त्यावर निर्णय घेईल”, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

केसीआरच्या खुर्चीला धक्का बसणार? तेलंगणात काँग्रेसने प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार