MP Election Result 2023 Live : मध्य प्रदेशमध्ये 2018चा दीड वर्षांचा अपवाद वगळता 2003 पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी 16 वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यामुळे या 2023च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला सत्ता मिळणार की, जनमत विरोधात जाऊन काँग्रेस सत्तेवर येणार याबाबत कमालीची उत्सुकता लागली होती मात्र आता पुन्हा एकदा भाजपने विजयी होताना दिसत आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभेच्या सर्व 230 जागांसाठी कल जाहीर केला आहे. भारतीय जनता पक्ष 230 पैकी 155 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 73 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार बहुजन समाज पक्ष आणि भारत आदिवासी पक्षाला प्रत्येकी एका जागेवर आघाडी मिळाली आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधनी विधानसभा मतदारसंघात आपली सातत्यपूर्ण आघाडी कायम ठेवली आहे. बुधनी जागेवर मतमोजणीच्या तीन फेऱ्या पार पडल्या असून शिवराज सिंह चौहान यांना आतापर्यंत 36,267 मते मिळाली असून त्यांच्याकडे 21,197 मतांची आघाडी आहे. येथे काँग्रेसचे विक्रम मस्ताल दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना ७,१६५ मते मिळाली आहेत. या जागेवर समाजवादी पक्षाचे मिर्ची बाबा यांना आतापर्यंत केवळ 22 मते मिळाली आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”