“हिचं शरीर कृत्रिम, कॉस्मेटिक सर्जरी करुन घेतल्या…”, माधवी निमकरने सांगितला अनुभव

Maadhavi Nemkar:- फिल्म इंडस्ट्रीत कलाकारांना खासकरुन अभिनेत्रींना अनेकदा नकारात्मक अनुभवांना सामोरे जावे लागते. चांगले पात्र, चांगला अभिनय करुनही बऱ्याचदा त्यांच्या शरीरयष्टीवरुन त्यांना बोलण्यात येतं. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या माधवी निमकर (Madhavi Nimkar Actress) हिनेही तिला आलेला अनुभव सांगितला आहे.

इंडस्ट्रीत आलेल्या अनुभवांविषयी एका मुलाखतीत सांगताना माधवी म्हणाली, “माझ्याबद्दल असंही म्हटलं जातं की, हिचं शरीर नकली आहे, खोटं काहीतरी करून हिने कृत्रिम शरीर बनवलंय. काहीजण असंही म्हणतात मी लिपोसेक्शन वगैरे केलंय असं सगळं माझ्याबद्दल बोलण्यात येतं आणि या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत.”

माधवी पुढे म्हणाली, “काही जणांना वाटतं मी काही कॉस्मेटिक सर्जरी करून घेतल्या आहेत. पण, हे सगळं खोटं आहे. लोकांच्या अशा नकारात्मक कमेंट्स ऐकून मला नेहमी हसायला येतं. माझ्या जवळच्या माणसांना मी फिटनेससाठी किती मेहनत घेतलीये हे चांगलंच माहिती आहे. हे सगळं मी कमावलंय. त्यामुळे अशा लोकांकडे मी लक्ष देत नाही. उलट मला कौतुक या गोष्टीचं वाटतं मी एवढी छान दिसतेय की, लोक माझ्या दिसण्याविषयी शंका घेऊ लागले आहेत. हे केवळ माझ्या मेहनतीमुळे शक्य झालं आहे.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्त्वाच्या बातम्या-

नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये बॉबी देओल कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार? जाणून घ्या सत्य

‘हे’ आहेत जगातील सर्वोत्तम तांदूळ, तांदळाची ‘ही’ भारतीय जात पहिल्या क्रमांकावर

अरे हे काय? इशानसाठी देशापेक्षा IPL महत्त्वाचे! मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी टीम इंडियातून बाहेर

Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणात अटकेत असणारा विठ्ठल शेलार नेमका कोण आहे?