या दहशतवादी हल्ल्याचा निषेध; पुण्यात ललित केंद्रातील प्रकरणानंतर मराठी अभिनेत्रीची प्रतिक्रिया चर्चेत

Pune SPPU News: पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) ललित कला केंद्रात (Lalit Kala Kendra) ‘बिहाइंड द स्क्रीन लाइफ ऑफ द ॲक्टर्स प्लेइंग रामलीला’ हा कार्यक्रम रंगला. मात्र स्टेजिंगदरम्यानच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या नाटकात माता सीतेशी संबंधित अनेक आक्षेपार्ह संवाद आणि दृश्ये दाखवल्याने हा वाद वाढला. वाद वाढत गेल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानंतर रामलीलावर आधारित नाटक करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी विद्यापीठातील प्राध्यापक आणि ५ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या संपूर्ण प्रकरणावरुन हास्य जत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने (Priyadarshani Indalkar) आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री प्रियदर्शनीने इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमधून तिने अखिल भारती विद्यार्थी परिषदेच्या या कृत्याचा निषेध केला आहे. ललितकला केंद्र, पुणे येथील विदार्थी कलावंतांवर हल्ला करुन नाटक बंद पाडणाऱ्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध… अशी पोस्ट प्रियदर्शनीने शेअर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

रंजले गांजलेल्यासाठी काम करण्याची सर्वांचीच जबाबदारी – मंत्री छगन भुजबळ