Udayanraje Bhosale | शिवरायांचे विचार खऱ्या अर्थाने मोदींच्या राजवटीत राबवले जातायत, उमेदवारीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया

Udayanraje Bhosale | सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर महायुतीने उमेदवार दिला आहे. साताऱ्यातून भाजपाने पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध ते लढणार आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मीडियाशी संवाद साधला. “उमेदवारीबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभाव संकल्पना राबवली. तोच विचार उराशी बाळगून मी 30 वर्ष लोकांची सेवा करतोय. त्यामुळे लोकांचे भरभरुन आशिर्वाद मला मिळाले. तरुण, माता-भगिनींची साथ मिळाली” असं उदयनराजे भोसले म्हणाले.

“आता मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आहे. याआधी वेगवेगळ्या पक्षांची बरीच सरकारं येऊन गेलीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, ते खऱ्या अर्थाने मोदींच्या राजवटीत राबवले जात आहेत. विकासकामं सुरु आहेत. मी या ठिकाणी आवर्जुन उल्लेख करीन माझे मित्र पूर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथ शिंदे आणि शेतकरी संघटना यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली चांगली विकासकाम सुरु आहेत” असं उदयनराजे भोसले म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Mohite Patil | “मोहिते पाटील स्वार्थी, त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली”, अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

Sharad Pawar : शरद पवारांची सारवासारव; सुनेत्रा पवारांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबाबत म्हणाले…

Sunetra Pawar | रखरखत्या उन्हातही सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद, धायरीत जंगी स्वागत