महेंद्रसिंग धोनीने इंग्लंडमध्ये साजरा केला वाढदिवस, ऋषभ पंतची खास उपस्थिती 

London –  आज भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) वाढदिवस आहे. तो 41 वर्षांचा आहे. इंग्लंडमध्ये एका खासगी समारंभात केक कापून त्यांनी वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी (Birthday celebration) खोली चमकदार झुंबरांनी सजवली होती. भारतीय संघाला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीने आपल्या खास शैलीत केक कापला. केक कापण्यासाठी त्याने दोन्ही हात वापरले. या सेलिब्रेशनमध्ये त्याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni)  त्याच्यासोबत उपस्थित होती.

धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आणि फोटो त्याची पत्नी साक्षीने इन्स्टाग्रामवर ( Instagram) शेअर केला होता, ज्यावर जगभरातून सातत्याने लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) माहीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला उपस्थित असलेल्या खास लोकांमध्ये फोटोमध्ये दिसत आहे. बर्मिंगहॅम (Birmingham) येथे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पाचवी कसोटी खेळल्यानंतर ऋषभ इंग्लंडमध्ये उपस्थित होता.

दरम्यान,  धोनीने जवळपास दोन वर्षांपूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. तो आता केवळ आयपीएलमध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना आणि कर्णधार म्हणून मैदानात दिसतो.