शिंदेंच्या नावाची घोषणा करुन फडणवीसांनी रिमोट कंट्रोल स्वतः कडे ठेवण्याचे काम केलेय – महेश तपासे

मुंबई   – मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा करुन देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis) एकनाथ शिंदेवर रिमोट कंट्रोल (Remote control) ठेवण्याचे काम केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (NCP state chief spokesperson Mahesh Tapase)  यांनी केला आहे.

निवडणूक आयोग (Election Commission) कोणत्या गटाला मान्यता देईल हे स्पष्ट नसताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे म्हणजे ख-या अर्थाने एका दगडात दोन पक्षांचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याची टीकाही महेश तपासे यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून भाजप त्यांना स्वतंत्र निर्णय घेऊ देतील की नाही हे माहीत नाही परंतु मुंबई, ठाणे, कल्याण – डोंबिवली या महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंचा उपयोग करून शिवसेनेला संपवण्याचा डाव भाजपने (BJP)  रचला असल्याचे महेश तपासे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना शुभेच्छा देत महेश तपासे यांनी रिमोट हा नागपूरहून (Nagpur) चालवला जाणार यात दुमत नाही असेही म्हटले आहे.