एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद; शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस (BJP leader Devendra Fadnavis) यांनी केली. या सरकारची जबाबदारी आमची असेल, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल.

आज शिवसेनेचा विधीमंडळ गट (Shiv Sena’s Legislative Group) शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजप आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला आहे. आणखी काही सोबत येत आहे. आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे, भाजपाने हा निर्णय केला, की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचच शपधविधी होईल,अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवून आणणाऱ्या आजच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.श्री. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री (New Chief Minister) म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन ! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे.