पिस्तुलाचा धाक दाखवून मातब्बर नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार

 Daund – महिलेवर सातत्याने अत्याचार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे  (ncp) माजी नगराध्यक्ष बादशहा शेख (Badshah Shaikh) यांच्या मुलासह सहा जणांवर दौंड पोलिसांनी (daund police) गुन्हा दाखल केला आहे. पीडिला तिच्या नव-याला सोडचिठ्ठी दे आणि माझ्याशी विवाह कर अन्यथा संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकेन अशी धमकी दिल्याचे तक्रार पीडितेने पोलिसांत केली आहे. वसीम शेख असं या मुलाचं नाव आहे.

या सगळ्या प्रकरणात त्याच्यासह एकून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने तक्रारीत म्हटल्यानुसार, वसीम बादशहा शेख याने पीडितेला घरी बोलावून पिस्तुल दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने व्हिडीओ काढला आणि तो व्हायरल करण्याची धमकी दिली.

विशेष म्हणजे यानंतर त्याने अनेकदा पिडीतेवर बलात्कार केला. या सगळ्याला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2021 ते 22 ऑगस्ट 2022 या दरम्यान घडला असल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे.