आमदार अपात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी; सुप्रीम कोर्टात हाय व्होल्टेज सुनावणी

नवी दिल्ली-  शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांमुळे ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) पडलं आणि राज्यात शिंदे सरकार (Eknath Shinde) आलं मात्र या सरकार विरोधात तसेच 16 आमदारांविरोधात ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात (Supreme) धाव घेतली. तसेच एक नाही दोन नाही तीन नाही, तब्बल चार याचिका दाखल केलेल्या  याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात हाय व्होल्टेज सुनावणी पार पडली.

आज झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. या सुनावणी दरम्यान  शिंदे यांची बाजू हरीश साळवे यांनी लढवली तर शिवसेनेचे वकील म्हणून कपिल सिब्बल हे ठाकरे गटाचे बाजू मांडत होते.या याचिकेवर पुढील सुनावणी 1 ऑगस्टला घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर गरज भासल्यास मोठ्या खंडपीठाकडेही पाठवले जाऊ शकतात असं मान्य करण्यात आले आहे. पक्षांना मुद्दे मांडण्यास, कागदपत्रे सादर करण्यास पुढील बुधवारपर्यंत वेळ दिला आहे.

एखाद्या गटाला नवा नेता मिळत असेल तर त्यात गैर काय असा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. तसेच आम्हाला कागदपत्रं सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ द्या, अशीही मागणी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी केला. तर शिंदे हे पक्षप्रमुखासारखे कसं वागू शकतात? असा सवाल ठाकरेंच्या वकिलांकडून करण्यात आला. तसेच पक्षाच्या बैठका घेण्याचा अधिकार हा शिंदेंना नाही, असाही युक्तीवाद करण्यात आला.