Manoj Jarange Patil यांची प्रकृती अतिशय नाजूक, पाणीही घोटेना

Manoj jarange Health Update: मराठा आंदोलक (Maratha protestors) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जसजसा वेळ जात आहे, तसतशी मनोज जरांगेंची प्रकृती खालावत आहे. कालच त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्यानंतर मराठा बांधवांकडून त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. अशातच आता पोटात अन्न, पाण्याचा कणही नसल्याने त्यांना अशक्तपणा आला आहे. अशक्तपणामुळे जरांगे पाटलांना भोवळ आली. यानंतर महंतांनी आग्रहाने जरांगेंनी पाणी पाजलं. पण, जरांगेची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पाणीही घोटवत नाही. त्यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत. जरांगेंच्या आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली आहे.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना पाणी घेण्याचा आग्रह आंदोलकांकडून करण्यात येत आहे. ‘पाणी घ्या’ म्हणत घोषणाबाजी सुरु आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज जरांगे यांच्या उपोषस्थळी दाखल झाले आहेत. तब्येत खालावली असल्याने आज मनोज जरांगे यांना पाणी पिण्यासाठी जोरदार आग्रह होत आहे. तसेच त्यांनी सलाईन लावून घेत उपचार घ्यावेत म्हणूनही विनंती होत आहे.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole