मानसी घुले-भोईरचे ‘सैंया’ अल्बमद्वारे संगीत विश्वात पदार्पण

Mansi Ghule-Bhoir : ऑक्टेव म्युझिक आणि मानसी फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘सैंया’ (SAIYAAN) हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कच्या ‘ओ’ हाॅटेलमध्ये संपन्न झालेल्या दिमाखदार समारंभात ‘सैंया’चे लाँचिंग पार पडले. यावेळी निर्माते भाऊसाहेब भोईर, संगीतकार नीरज श्रीधर, अभिनेत्री कायनात अरोरा, मानसी घुले-भोईर, आदी उपस्थित होते. यातील ‘सैंया’ गाणे नीरज श्रीधर यांनी संगीतबद्ध केले असून बाॅलीवुड अभिनेत्री कायनात अरोरावर चित्रित झाले आहे. मानसी घुले-भोईर हिने पार्श्वगायिका म्हणून या म्युझिक अल्बमद्वारे संगीत क्षेत्रात पदार्पण केले असून तिने कायनात सोबत यात अभिनय देखील केला आहे.

मानसीचे ‘सैंया’ हे पहिलेच गाणे आहे. तिला हे गाणे गाण्याची संधी कशी मिळाली याबाबत ती म्हणाली की,  माझं शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरु असून निरज मिश्रा सर हे माझे वडीलधारे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मुळे नीरज श्रीधर सरांची ओळख झाली आणि त्यांनी दोन-तीन गाणी सुचवली त्यात ‘सैंया’ देखील होतं.

गाण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना मानसी म्हणाली की,  माझा हा पहिलाच अनुभव होता पण तो खूप ठरला. दिग्दर्शक शाॅन कॅमरुन आणि नृत्य दिग्दर्शक लाॅलीपाॅप यांच्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. हा सुंदर व्हिडिओ त्यांच्या मेहनतीमुळे घडला. त्यांच्या मार्गदर्शनात मी माझ्याकडून शंभर टक्के मेहनत घेतली. त्यामुळेच हे सादरीकरण उत्तम झाले. सुधाकर चव्हाण, नीरज श्रीधर यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल मानसीने सांगितले की, ज्यांची गाणी ऐकत लहानाची मोठी झाले त्या नीरज सरांसोबत काम करताना एक प्रकारचे दडपण आले होते पण त्यांना भेटल्यानंतर कळले की ते अतिशय ‘डाऊन टू अर्थ’ व्यक्तिमत्व आहेत. नम्र आणि स्वागतशील स्वभाव हे त्यांचे वैशिष्टच आहे. पहिल्या संधीत लाभलेले असे उत्कृष्ट मार्गदर्शन ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.

संगीत आणि गायनाच्या आवडीविषयी मानसीने माहिती दिली की, सुधाकर चव्हाण यांच्याकडे ती लहानपणापासूनच शास्त्रीय संगीत शिकत आहे. तिने शास्त्रीय संगीताच्या चार परीक्षाही दिल्या आहेत. पुढील परीक्षेची तयारी सुरू आहे. याव्यतिरिक्त वेस्टर्न म्युझिक आणि पॉप म्युझिक ही तिची विशेष आवड आहे. त्याकरिता ती दोन वर्षापासून सिंथिया Furtado यांच्याकडे वेस्टर्न पॉप म्युझिकचे शिक्षण दोन घेत आहे.

कुटुंबियांबाबत बोलताना मानसीने सांगितले की, माझे कुटुंब ही माझ्यासाठी मोठी सपोर्ट सिस्टमच आहे! सासूबाई खूप साथ देतात, अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात. शूटिंगच्या वेळी माझी मुलगी आणि सासूबाई मला प्रोत्साहन देण्यासाठी सोबतच सेटवर असायच्या. माझ्या रियाजापासून खाण्यापिण्याची देखील काळजी घेतात. सासऱ्यांचेही मोलाचे प्रोत्साहन आहे. माझे वडिल म्हणजे भाऊसाहेब भोईर. ते स्वतः अनेक वर्षे नाट्यचित्रपट क्षेत्राशी प्रत्यक्ष निगडित आहेत, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन मला आशीर्वादासारखे कायम पाठीशी असते.

महत्वाच्या बातम्या-

You May Also Like