Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मुस्लिम समाज मैदानात, पुण्यात लाक्षणिक उपोषण

Maratha Reservation: मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणाला बसले आहेत . दरम्यान मराठवाड्यातील बीड, हिंगोली ,परभणीसह, महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलने होत आहेत आज पुण्यातील कोंढवा परिसरात दि मुस्लिम फाऊंडेशनच्या वतीने लाक्षणिक उपोषण करुन, संस्थापक अध्यक्ष  माजी नगरसेवक गफूर पठाण यांच्या नेतृत्त्वाखाली मुस्लिम समाजातील (Muslim Samaj) नागरिक यांनी मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला .यावेळी पुणे शहरातील मुस्लिम समाजाचे युवक मोठ्या संखेने सहभागी झाले होते .

एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच, नाही कोणाच्या बापाच, अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी गफूर पठाण म्हणाले की, मागील सहा दिवसापासुन मराठा आरक्षणासाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे.मात्र त्यावर राज्य सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका मांडताना दिसत नाही.त्या पार्श्वभूमीवर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी आज लाक्षणिक उपोषण करीत आहे.राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा,अन्यथा आणखी अधिक तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला. या आंदोलनाचे नेतृत्व मुस्लिम फाउंडेशन चे संस्थापक हाजी गफूर पठाण यांनी केले होते यावेळी

इम्तियाज शेख ,समीर शेख ,ओबेद शहा ,नदीम शेख मुज्जू शेख ,महम्मदिन खान ,बापू मुलाणी ,राजू आडगळे ,शाहबाज पंजाबी ,मुनाफ मामू शाखीर शेख संजय लोणकर गणेश भोईते ,नरेश बनसोडे,इक्बाल मुलाणी ,राज अहमद, जावेद शेख ,मुबिन शेख ,शाहिद शेख यासह पुणे शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येंने उपस्थित होता.

महत्वाच्या बातम्या-

इश्क पर किसका जोर! काकूच्या प्रेमात वेडा झाला पुतण्या, पळून जाऊन लग्नाचं केलं प्लॅनिंग; पण…

मराठा आरक्षणाबाबत सरसकट निर्णय घ्या!- अशोक चव्हाण

रामा राघव फेम अभिनेत्री श्रद्धा पवारचं ‘प्रपोज’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला