राहुल कनाल यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत; शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांच्या अडचणी वाढणार ?

मुंबई : शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी छापेमारी झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने काल छापा  टाकण्यात आला आहे.

राहूल कनाल यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.तसेच शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरावर सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा आयकर विभागाची छापेमारी ही सुरूच असल्याची माहिती मिळत आहे.

राहूल कनाल हे बांद्रा परिसरात राहतात. तिथं दिवसभर आयकर विभागाने त्यांची चौकशी केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दिवसभर चौकशी करत असताना कनाल यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.