मांडीवर वर्षांचं बाळ घेऊन सरोज अहिरे बसल्या उपोषणाला, मराठा आरक्षणाची मागणी

Saroj Ahire Hunger Strike With Baby: महाराष्ट्रात मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा सद्या कळीचा मुद्दा बनला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे. जरांगे पाटलांना पाठींबा दर्शवत आता राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे (Saroj Ahire) एकदिवसीय उपोषणाला बसल्या आहेत. नाशिकमधील सौभाग्य नगर भागातील आपल्या संपर्क कार्यालयासमोर त्या उपोषणाला बसल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्या चिमुकल्याला मांडीवर घेऊन अहिरे उपोषण करत आहेत. अहिरेंचं बाळ जेमतेम वर्षभराचं असून त्याचं नाव प्रशंसक आहे.

मराठा आरक्षण व उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या समर्थनार्थ सरोज अहिरे आपल्या समर्थकांसह एक दिवसीय अन्न व जल त्याग उपोषणासाठी बसल्या आहेत. आरक्षण प्रश्नी उद्या राज्यपाल रमेश बैस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेत विशेष अधिवेशन बोलवण्याबाबत साकडे घालणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

इश्क पर किसका जोर! काकूच्या प्रेमात वेडा झाला पुतण्या, पळून जाऊन लग्नाचं केलं प्लॅनिंग; पण…

मराठा आरक्षणाबाबत सरसकट निर्णय घ्या!- अशोक चव्हाण

रामा राघव फेम अभिनेत्री श्रद्धा पवारचं ‘प्रपोज’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला