एनर्जी वाढवणाऱ्या ‘या’ गोष्टींमुळे पुरुषांना तरुण वयातच पडू शकते टक्कल! आतापासूनच घ्या काळजी

वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, केस गळणे आणि केस पांढरे होणे ही वृद्धत्वाची लक्षणे आहेत. जर आपण केसांबद्दल बोललो तर कोणाला वयाच्या आधी केस गळावेसे वाटत नाही. स्त्री असो वा पुरुष, केस प्रत्येकासाठी आवश्यक असतात. तुमचे व्यक्तिमत्व केसाशी संबंधित असते. पण जर तुम्हाला असे समजले की तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सेवन करत असलेल्या पेयांमुळे तुमचे मौल्यवान केस गमावत आहात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल परंतु एका अभ्यासात असे समोर आले आहे की, एनर्जी ड्रिंक नियमितपणे पिल्याने तुमचे केस लवकर गळतात.

‘द सन’च्या मते पुरुषांना एनर्जी ड्रिंक्स (Energy Drinks) खूप आवडतात. पण नियमितपणे एनर्जी ड्रिंक घेतल्याने पुरुषांमध्ये टक्कल (Hairfall In Men) पडण्याचा धोका 30 टक्क्यांनी वाढतो. संशोधनात असे सांगण्यात आले की, जे केवळ एनर्जी ड्रिंक्सच नव्हे तर फिजी ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक्स आणि अगदी गोड चहा आणि कॉफी देखील घेतात त्यांना केस गळण्याचा धोका जास्त असतो (Energy Drinks Cause Hair Loss).

शीतपेय पिऊनही केस गळतात
हे संशोधन चीनची राजधानी बीजिंग येथील सिंघुआ विद्यापीठातील तज्ज्ञांनी केले आहे, ज्यामध्ये त्यांना असेही आढळून आले आहे की फिजी ड्रिंक्स (कोक, पेप्सी सारखे सॉफ्ट कार्बोनेटेड पेये) आणि स्पोर्ट्स ड्रिंक्स (इलेक्ट्रोलाइट युक्त पेये जे क्रीडापटू पाण्याऐवजी पितात) घेतल्याने लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो.

न्यूट्रिएंट्स या जर्नलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या अभ्यासात सहभागी पुरुष आठवड्यातून नियमितपणे एक ते तीन लीटर या पेयांचे सेवन करतात, ते केस गळण्याच्या समस्येस वेगाने बळी पडतात. त्याच वेळी, जे लोक दररोज एकापेक्षा जास्त वेळा साखरयुक्त पेये पितात त्यांच्यात अशा पेयांना स्पर्श न करणाऱ्यांपेक्षा केस गळण्याची शक्यता 42 टक्के अधिक असल्याचे दिसून आले. अभ्यासातील पुरुष ज्यांनी कबूल केले की त्यांना केस गळतीचा अनुभव येत आहे, त्यांनी आठवड्यातून सरासरी 12 साखरयुक्त गोड पेये घेतली.

चार महिने अभ्यास केला
या काळात तज्ज्ञांनी १८ ते ४५ वयोगटातील १,००० हून अधिक चिनी पुरुषांच्या खाण्याच्या सवयींचा चार महिने अभ्यास केला. यादरम्यान त्यांना त्यांच्या खाण्याच्या सवयी तसेच त्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित माहितीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले.

केसगळतीसाठी हे घटकही कारणीभूत 
अभ्यासात, केवळ पेयांचेच मूल्यांकन केले गेले नाही तर पुरुषांच्या खाण्याच्या सवयी देखील विचारात घेतल्या गेल्या. अभ्यासात असे दिसून आले की जे पुरुष त्यांच्या दैनंदिन जीवनात कमी भाज्या आणि जास्त फास्ट फूड खातात त्यांना केस गळतीचे प्रमाण अधिक होते. याशिवाय चिंतेचा घटकही या संशोधनात समोर आला. ज्या पुरुषांना जास्त चिंतेचा सामना करावा लागतो त्यांनाही जास्त धोका असल्याचे दिसून आले. याआधीही अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की केस मजबूत आणि सुंदर ठेवण्याचे रहस्य हेल्दी डायट हे आहे.