Muralidhar Mohol | मनसैनिकांना सोबत घेऊन आम्ही एकदिलाने या निवडणुकीला सामोरे जाऊ

Muralidhar Mohol | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आपल्या पक्षानं बिनशर्त पाठिंबा देऊ केल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे मनसे महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवणार नाही आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मदत करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

मनसेने पाठींबा जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याबाबद्दल पुण्याचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख मा. राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला शिवतीर्थावरुन दिलेला बिनशर्त पाठिंबा, हा त्यांच्या देशाच्या विकासाबद्दल असलेला सच्चेपणा अधोरेखित करतो. हिंदू नववर्षाच्या शुभदिनी केलेल्या या घोषणेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांना निश्तितच बळ मिळाले आहे. पुणे लोकसभा निडणुकीतही मनसैनिकांना सोबत घेऊन आम्ही एकदिलाने या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि मोठ्या मताधिक्याने जिंकू, हा विश्वास वाटतो.असे मोहोळ यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख  राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा-आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या! अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा