विधेयकाच्या मसुद्यात २८ टक्के लोकसंख्या, मात्र आरक्षण १० टक्केच; मराठा आरक्षणाबद्दल रोहित पवारांचे मोठे वक्तव्य

Rohit Pawar : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाकडे (Special Session) सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. या अधिवेशनात राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha society) शिक्षणात १० टक्के आणि नोकरीत १० टक्के आरक्षण लागू केले आहे. राज्य सरकारच्या या घोषणेनंतर विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) मराठा आरक्षणाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल सवर्पक्षीय आमदारांचे व सरकारचे आभार! मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले ‘आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न करुया’ हे शब्द मात्र यापूर्वीचा राजकीय अनुभव बघता भीतीदायक वाटतात!, असे रोहित पवार म्हणाले.

विधेयकाचा (Special Session) मसुदा वरकरणी पाहता त्यात अनेक त्रुटी दिसत असून २८% लोकसंख्या दाखवताना आरक्षण मात्र १० % देण्याचा निर्णय कुठल्या आधारावर झाला, हे स्पष्ट होत नाही. तसंच सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगासंदर्भात नोंदवलेली निरीक्षणेही दुरुस्त केलेली दिसत नाहीत. एकदरीतच निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत विधेयक आणण्याचा सरकारचा प्रयत्न सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा ठरू नये. असो! हे विधेयक टिकवण्यासाठी सरकारसह सवर्पक्षीय नेते प्रामाणिक प्रयत्न करतील, हा विश्वास आणि अपेक्षा आहे!, असेही रोहित पवार एक्स (जुने ट्वीटर)वरील पोस्टमध्ये म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा