Marathi movie | ‘भुंडीस’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा थाटात पार

ए स्क्वेअर ग्रुप निर्मित ‘भुंडीस’ हा मराठी चित्रपट (Marathi movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा नुकताच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर येथे थाटात पार पडला. या सोहळ्यास निर्माते दत्ता दळवी, लेखक सोमनाथ तांबे आणि दिग्दर्शक वैभव सुपेकर उपस्थित होते तसेच कलाकार भरत शिंदे (चांडाळ चौकडी फेम बाळासाहेब ), रामभाऊ जगताप (चांडाळ चौकडी फेम रामभाऊ ), यशराज डिंबळे, सुरेखा गव्हाणे, माणिक काळे, कुमार पाटोळे, अश्विन तांबे, अनुष्का बेनके, सुभाष मदने, अविनाश कीर्ती, शितल आदमाने, श्वेता परदेशी आदी कलाकारांनी हजेरी लावली होती.

निर्माते दत्ता दळवी यांनी सांगितले की, ‘भुंडीस’चित्रपटाचे कथानक (Marathi movie) हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. या चित्रपटामध्ये एका कुटुंबाचा सत्यासाठी व त्यांच्या मुलासाठीचा संघर्ष दाखविण्यात आला आहे.या चित्रपटाची मांडणी विनोदी पद्धतीने केली असली तरी हा चित्रपट आपल्याला वेगळ्या वातावरणात घेवून जातो. चित्रपटामध्ये आपण जे क्षण पाहतो त्या प्रत्येक क्षणाशी प्रेक्षक जोडला जाईल.या कथेद्वारे सामान्यातून असमान्य व्यक्ती कशी तयार होते आणि प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे समजून येते.ही कथा प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.या चित्रपटाची कथा ही प्रेरणादायी असून हा एक कौटुंबिक संघर्ष आहे. सर्व कलाकारांनी मिळून हा संघर्ष सुखावह केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक प्रेरणा आणि उर्जेचा स्त्रोत घेवून बाहेर पडेल याबाबत दुमत नाही.

चित्रपटाबद्दल सांगताना लेखक सोमनाथ तांबे सांगतात की, हा सिनेमा लिहीत असताना लहानपणापासून जे अनुभवले, जे सोसले ते शब्दरुपी या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘भुंडीस’ चित्रपट फक्त करमणुकीसाठी नसून या सिनेमात अनेक प्रसंग आपल्या जीवनाशी निगडीत असून नक्कीच प्रत्येकाला ते प्रश्न स्वत:चे वाटतील.खूप सुंदर सिनेमा झाला असून प्रत्येकाने आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन पहावा अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दिग्दर्शक वैभव सुपेकर म्हणाले की, मातीशी नाळ असलेला हा सिनेमा बनवणे आणि त्याचा मी दिग्दर्शक असणे यासाठी मी स्वत:ला फार नशीबवान समजतो. माझ्या पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी निर्माते ही तेवढेच अभ्यासू व अनुभवी मिळाले आहेत. लेखकांनी ही पटकथेची बाजू सोपी करून मांडली असल्याने आणि संवादाला योग्य न्याय देणारे कलाकार सोबत असल्याने चित्रपट पूर्णत्वास नेण्यासाठी आणखी सोपं झालं.

गायक आदर्श शिंदे, नंदेश उमप, राखी चौरे, निधी हेगडे हे आहेत. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून विशाल डोरले तर चित्रपटातील नृत्य दिग्दर्शन सागर रोकडे, आरती गुप्ता यांनी केले आहे. चित्रपटाचे छायांकन भास्कर ठोकळ यांचे असून कलादिग्दर्शन सुभाष भनभने, सचिन इचके, ऋषि मखर यांचे आहे, तर कार्यकारी निर्माते म्हणून संदीप काकडे आणि प्रोडक्शन प्रशांत बोगम व बंटी पाटसकर यांनी केले आहे. पोस्ट प्रोडक्शन ND9 स्टुडिओ नावेद अत्तार आणि प्रोडक्शन डिझाईन कुमार गावडा यांनी केले आहे.

‘भुंडीस’ चित्रपट येत्या १७ मे २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय! मोनिका मोहोळांचा ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके