Prakash Ambedkar | राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्याने उत्तर भारतीय असुरक्षित

Prakash Ambedkar | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आपल्या पक्षानं बिनशर्त पाठिंबा देऊ केल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे मनसे महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवणार नाही आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मदत करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

मनसेने पाठींबा जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विरोधी पक्षांच्या निशाण्यावर राज ठाकरे आले आहेत. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहे. ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असावे. मुंबईसारख्या शहरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते. ते म्हणजे लुंगी हटाव, पुंगी बजाव. त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले. मनसेने धारावी या ठिकाणी छ्ट पूजेला विरोध केला.बिहारमधील लोकांना मारल्याची आठवणही आंबेडकर यांनी करुन दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय! मोनिका मोहोळांचा ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके