‘पेगॅसस वापरून पत्रकार, विरोधक, विचारवंतांवर पाळत ठेवणा-या खऱ्या सुत्रधारांची नावे समोर येतील’

‘पेगॅसस वापरून पत्रकार, विरोधक, विचारवंतांवर पाळत ठेवणा-या खऱ्या सुत्रधारांची नावे समोर येतील’

मुंबई : पेगॅसस स्पायवेअर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अत्यंत महत्वपूर्ण असून या निर्णयाचे काँग्रेस पक्ष स्वागत करत आहे. लोकांच्या खाजगी आयुष्यात हेरगिरी करणे हा घटनेने दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला असून केंद्रातील भाजपा सरकारने हे काम केले आहे का नाही, याची चौकशी झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी होती. ती न्यायालयाने उचलून धरली असून आता यामागचे खरे सुत्रधार जनतेसमोर आले पाहिजेत, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने पेगॅसस हेरगिरी प्रकरणी चौकशी लावलेली आहे. या चौकशीतून पेगॅसस वापरून लोकांवर पाळत ठेवणा-या आणि व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणा-या मोदी शहांनी चालवलेला सत्तेचा गैरवापर बाहेर येईल. केंद्र सरकारने या प्रकरणातही टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय सुरक्षेचा बाऊ करत माहिती देण्यास टाळाटाळ केली परंतु केंद्र सरकारच्या कोणत्याच नौटंकीला न जुमानता सुप्रीम कोर्टाने तज्ञांची चौकशी समिती नेमली. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करुन केंद्र सरकारला सामान्य नागरिकांच्या मुलभूत हक्कावर गदा आणता येणार नाही हेच न्यायालयाने बजावले आहे. आमचे नेते खा. राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करुन सरकारला जाब विचारला होता. सर्व विरोधी पक्षही राहुलजींच्या नेतृत्वाखाली या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर एकत्र आले होते पण हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करणाऱ्या मोदींनी त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले मात्र न्यायालयाने या हुकूमशाहीवृत्तीला जुमानले नाही. न्यायालयाने चौकशी समिती नेमणे ही मोदी सरकारला मोठी चपराकच आहे.

महाराष्ट्रातही फडणवीस सरकारच्या काळात माझ्यासह अनेक विरोधकांचे फोन टॅप करण्यात आले होते. माझा फोन नंबर व अमजद खान असे नाव ठेवून थेट अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंध जोडून फोन टॅप करण्यात आला होता. हा प्रश्न मी विधानसभेतही उपस्थित केला होता. तसेच राज्यातील विचारवंतांच्या लॅपटॉपमध्ये मालवेअर टाकून त्यांना तुरुंगात टाकणे, पेगॅससचा वापर करुन पत्रकार, विरोधक, विचारवंतांवर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पाळत ठेवणण्याचे काम केले. न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर राज्यातील हेरगिरी प्रकरणातील सुत्रधारही बाहेर येतील, अशी आशा नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o

Previous Post
‘भाजपमध्ये आल्यावर ईडी मागे लागत नाही, म्हणून शांत झोप लागते’

‘भाजपमध्ये आल्यावर ईडी मागे लागत नाही, म्हणून शांत झोप लागते’

Next Post
आर्यन खानच्या आधी हे 10 स्टार्स देखील आले होते समीर वानखेडे यांच्या रडारवर

आर्यन खानच्या आधी हे 10 स्टार्स देखील आले होते समीर वानखेडे यांच्या रडारवर

Related Posts
12th Fail’ चित्रपटाचे वास्तवातील नायक आयपीएस शर्मा यांचा विद्यार्थांशी प्रेरक संवाद | IPS Manoj Kumar Sharma

12th Fail’ चित्रपटाचे वास्तवातील नायक आयपीएस शर्मा यांचा विद्यार्थांशी प्रेरक संवाद | IPS Manoj Kumar Sharma

IPS Manoj Kumar Sharma | ‘आपल्या मुलांनी ९५ टक्क्यांहून अधिकच गुण मिळवले पाहिजेत अशी पालकांची अपेक्षा असते. त्याच्याच…
Read More
अमित शाह

सर्व राजकीय पक्षांनी सीमावादाचा प्रश्न चिघळणार नाही याची खबरदारी घ्यावी : अमित शाह

नवी दिल्ली : महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा प्रश्न समन्वयातून सोडवावा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्र…
Read More
गुढीपाडव्यानिमित्त आज मनसेचा मेळावा ; राज ठाकरे काय बोलणार?

गुढीपाडव्यानिमित्त आज मनसेचा मेळावा ; राज ठाकरे काय बोलणार?

Raj Thackeray | गुढीपाडव्यानिमित्त आज मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) भव्य मेळावा होणार आहे. राज्यभरातून मनसैनिक…
Read More