मुलांच्या आरोग्याला धोक्यात आणू शकतात हेल्थ ड्रिंक्स, त्यात असणारे ‘हे’ ४ पदार्थ शरीरासाठी घातक

Child Care Tips : आजकाल असे अनेक पदार्थ बाजारात आले आहेत, जे लहान मुले मोठ्या उत्साहाने खातात. मुलांना सहज दूध प्यायला मिळावे म्हणून पालक त्यांच्या दुधात हेल्थ ड्रिंक किंवा पावडर टाकून ते चवदार बनवतात. जे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. आजकाल हेल्थ आणि एनर्जी ड्रिंक्सचा ट्रेंड सुरू झाला आहे, ज्याच्या सेवनाने डिहायड्रेशनसारख्या समस्या दूर करण्याचा दावाही केला जातो. परंतु त्याचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हेल्थ ड्रिंक्समध्ये आढळणाऱ्या काही गोष्टींचा थेट मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो (Harmful Health Drinks For Kids). त्याबद्दल जाणून घेऊया..

साखर
आजकाल लहान मुलांसाठी अनेक प्रकारचे एनर्जी ड्रिंक्स बाजारात आले आहेत. जे पिल्यानंतर मुले ऍक्टिव्ह होतील असा दावा केला जातो. हे प्यायल्यानंतर मुले ऍक्टिव्ह देखील होतात, परंतु त्यांना आजार देखील होऊ शकतात. या हेल्थ ड्रिंक्समध्ये साखर मोठ्या प्रमाणात आढळते. यामुळे लठ्ठपणा, दात किडणे, झोप न लागणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. एनर्जी ड्रिंक्समधील साखर त्याचा गोडवा तर वाढवते, परंतु बर्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की मुलांच्या शिकण्याच्या, समजून घेण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर देखील त्याचा वाईट परिणाम होतो.

सोडियम
बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक हेल्थ ड्रिंक्स आणि आरोग्यदायी पदार्थांमध्ये सोडियम मुबलक प्रमाणात आढळते. विशेषतः पॅकेज्ड फूडमध्ये सोडियमचे प्रमाण खूप असते. याचे सेवन केल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा, तणाव आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 8 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये सोडियमच्या जास्त प्रमाणामुळे उच्च रक्तदाबाचा धोका असतो, त्यांना हृदयविकारही होऊ शकतो.

कॅफिन
कॅफिन हे मुलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. एनर्जी किंवा हेल्थ ड्रिंक्समध्ये कॅफिन मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे उच्च रक्तदाब आणि निद्रानाश होऊ शकतो. यामुळे मूड स्विंग आणि तणावासारख्या समस्यांचाही धोका असतो. कॅफिनयुक्त पेयांमुळे मुलांमध्ये डोकेदुखी देखील होऊ शकते.

उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरप
अनेक हेल्थ ड्रिंक्समध्ये उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरप असते. ज्याच्या सेवनामुळे आरोग्याशी संबंधित समस्या सुरू होतात. भातासारखे कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराला ग्लुकोज मिळते, जे पेशींच्या मदतीने संपूर्ण शरीरात सहज पसरते. तथापि, जेव्हा उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरप मुले वापरतात, तेव्हा त्याचे इंधनात रूपांतर होण्यापूर्वी ते चरबीमध्ये बदलते आणि यकृतामध्ये जमा होण्यास सुरवात होते.

(सूचना: या लेखात नमूद केलेल्या माहिती, पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.)