MCD Result 2022 : आपकडून भाजप पराभूत, १५ वर्षांची मक्तेदारी मोडली! 

MCD Result 2022: दिल्लीच्या आम आदमी पार्टीने MCD मध्ये करिष्माई कामगिरी केली आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, एमसीडीच्या 250 प्रभागांवर झालेल्या नागरी निवडणुकीत AAP ने 134 जागा जिंकल्या आहेत. त्याच वेळी, दुसऱ्या क्रमांकावर भाजपचा होता, ज्याने 104 जागा जिंकल्या. काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. 250 प्रभागांपैकी केवळ 9 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर 3 जागा इतरांच्या खात्यात गेल्या आहेत.(MCD Result 2022 : BJP defeated by AAP, 15 years monopoly broken!)

भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत वर्षानुवर्षे विजय मिळवला नसला तरी एमसीडीमध्ये त्यांची राजवट कायम आहे. MCD मध्ये 2007 पासून भाजपा बहुमतात होती. म्हणजेच दशकाहून अधिक काळानंतर भाजपचा बालेकिल्ला ढासळला आहे. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागांवर भाजपचे नियंत्रण आहे. भाजप आणि काँग्रेसला विधानसभेच्या जागा जिंकणे अशक्य झाले आहे. अरविंद केजरीवाल यांची जादू इथे चालते. किमान एमसीडीमध्ये तरी आपली राजवट कायम राहील, असे भाजपला वाटत होते, पण तसे होऊ शकले नाही.