औरंगाबादचे नाव बदलल्याने एमआयएमला झोंबल्या मिरच्या; मोर्चा काढण्याचा दिला इशारा 

Mumbai – औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजे यांची हत्या केली. त्यामुळे त्याच्या नावाचे शहर नको. अशी मागणी घेऊन औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) करण्याची मागणी करण्यात येत होती.  आज याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता यापुढे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद धाराशिव म्हणून ओळखलं जाणार आहे.

एमआयएमने या नामांतराला विरोध केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या निर्णयावर एमआयएमचे नेते असदुद्दीन औवैसीही प्रचंड संतापले आहेत. ओवैसी यांनी या निर्णयावरून केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही तर हुकूमशाही आहे, अशी टीकाच ओवैसी यांनी केली आहे.