“उदगीर नगरपरिषदे द्वारे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अमृत घनवन निर्मितीचा संकल्प”

आज शुक्रवार दिनांक १५/०९/२०२३ रोजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या मार्गदर्शनाने मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या नियोजनाने उदगीर नगरपरिषद द्वारे शिवाजी महाविद्यालय – राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विविध सामाजिक संस्था यांच्या साह्याने मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष निमित्ताने “अमृत घनवन” निर्मिती करण्याची सुरुवात नगरपरिषद मालकीच्या बनशेळकी तलाव परिसर येथे करण्यास सुरुवात झाली असून याचा एक भाग म्हणुन आज ७५० विविध देशी प्रजातीच्या रोपांची लागवड मुख्याधिकारी शुभम क्यातमवार शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद नवले, उपप्राचार्य डॉ.रामकिसन नवले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सुरेश शिंदे, प्रा.डॉ.अनंत टेकाळे, प्रा.बालाजी सूर्यवंशी, सामाजिक संस्था कारव व रोटी कपडा बँक यांचे सदस्य, नगरपरिषद कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी, यांच्या सह विद्यार्थी यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या-