विधान परिषद निवडणूक : शिवसेनेकडून दिग्गज नेत्यांना डच्चू

Mumbai – राज्यात विधान परिषदेच्या (Legislative Council) दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर होईल. त्यानंतर 9 जून पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात विधानपरिषदेतून सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांच्यासह सुभाष देसाई(subhash desai), दिवाकर रावते(diwakar Rawate), (शिवसेना) प्रवीण दरेकर(Pravin darekar), सदाभाऊ खोत(sadabhau khot), प्रसाद लाड(Prasad lad), विनायक मेटे(Vinayak mete), सुजितसिंह ठाकूर, स्व. आर. एस. सिंह, (Sujit Singh Thakur, late. R. S. sinh) (सर्व भाजप) संजय दौंड(sanjay duand) (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे सहा आणि भाजपचे चार या प्रमाणे नव्या रचनेनुसार आमदार निवडून येतील. मात्र भाजप आपला पाचवा उमेदवार रणांगणात उतरवेल अशी शक्यता आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून दोन नव्या उमेदवारांना संधी (Shiv Sena candidates for Vidhan Parishad) देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातील 2 जागा आहेत. त्याजागी शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) आणि दिवाकर रावते (Diwakar Raote) हे आमदार होते. मात्र, आता या दोन्ही नेत्यांना पुन्हा संधी न देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, देसाई हे मंत्री असल्याने आता त्यांची जागा कोण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सोबतच मंत्रिमंडळात लवकर यामुळे फेरबदल होतील अशी देखील शक्यता निर्माण झाली आहे.विधानपरिषदेच्या 20 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.