यश होऊन तनवीर अख्तरने जवळीक वाढवली आणि मग एक दिवस जे नको तेच घडलं 

Love Jihad:  मुंबईत राहणाऱ्या एका मॉडेलने आरोप केला आहे की, तनवीर अख्तर नावाचा एक व्यक्ती तिला काही दिवसांपासून ब्लॅकमेल करत आहे. यासोबतच तो मॉडेलवर धर्मांतर करून लग्न करण्यासाठी दबाव टाकत आहे.

२०२० मध्ये ही मॉडेल रांचीमधील एका मॉडेलिंग कंपनीच्या संपर्कात आली. जिथे यश नावाच्या व्यक्तीने तिला कामावर ठेवले. त्यानंतर काही महिन्यांनी तिला कळले की ती ज्या व्यक्तीला यश मानत होती त्याचे खरे नाव तनवीर अख्तर खान आहे.

तनवीर अख्तरने हळूहळू तिच्याशी जवळीक वाढवली आणि एक दिवस तिला बेशुद्धीचे औषध देऊन तिच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढले असा आरोप मॉडेलच्या वतीने करण्यात आला आहे. तन्वीरवर आरोप आहे की, या फोटोंच्या आधारे त्याने मॉडेलवर स्वत:शी लग्न करण्यासाठी दबाव आणला आणि कथितपणे धर्मांतर केले.

मॉडेलने स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीच्या भीतीने तनवीर अख्तरने आधी मॉडेलला पैशाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याला व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी तनवीरने रांचीहून मुंबई गाठून तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही मॉडेलने केला आहे.

तन्वीरने असे केले ती ती पहिली मुलगी नाही, असा दावाही मॉडेलने केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी हे प्रकरण झारखंडमधील असल्याचे सांगितले, त्यामुळे तक्रार मिळाल्यानंतर एफआयआर नोंदवून झारखंड पोलिसांकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रथमदर्शनी लव्ह जिहादचा गुन्हाही पाहिला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तन्वीर अख्तरविरुद्ध कलम ३७६, ३७६ (२), ३७६ (एन), ३२८, ५०६, ५०४, ३२३ आणि आयटी कायद्याच्या कलम ६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.ABPन्यूज ने याबाबत वृत्त दिले आहे.