मोदी सरकारचा करदात्यांना मोठा दिलासा; 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही

Budget 2023 Live Updates : मोदी सरकारकडून (Modi Government) करदात्यांना मोठा दिलासा जाहीर करण्यात आला आहे. आता 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही, जे आतापर्यंत 5 लाख रुपये होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नवीन कर प्रणाली अंतर्गत करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.

नवीन आयकर प्रणाली अंतर्गत, कर सूट मर्यादा 7 लाख रुपये करण्यात आली आहे. नवीन आयकर नियमानुसार 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. 3 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर भरावा लागेल. 6 ते 9 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के, 9 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15 टक्के, 12 ते 15 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के आयकर लागेल.

नवीन आयकर प्रणालीमध्ये 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2.50 ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आकारला जातो, ज्यामध्ये 87A अंतर्गत सूट देण्याची तरतूद आहे. 5 ते 7.50 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के, 7.50 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के, 10 ते 12.50 लाखांच्या उत्पन्नावर 20 टक्के, 12.5 ते 15 लाख आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 25 टक्के. उत्पन्नावर 30% कर भरावा लागतो.