हार्दिकच्या नेतृत्त्वाखालील मुंबईच्या अडचणी वाढणार, Suryakumar आयपीएलला मुकण्याची शक्यता

Suryakumar Yadav and Mohammed Shami: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाला मोठा धक्का बसणार आहे. अनुभवी स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेतून बाहेर होऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे त्याची दुखापत, जी अद्याप बरी झालेली नाही.

याशिवाय इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल, IPL) 5 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) डोकेदुखीही वाढणार आहे. त्याचे कारण म्हणजे सूर्यकुमार यादवची दुखापत (Suryakumar Yadav Injury). भारतीय संघाला 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची घरेलू टी-20 मालिका खेळायची आहे.

या मालिकेसाठीही सूर्याची निवड झाली नव्हती. यानंतर भारतीय संघ 25 जानेवारीपासून घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. अशा परिस्थितीत शमी या मालिकेतून बाहेर पडणार हे निश्चित मानले जात आहे किंवा तो पहिले 2 सामने गमावू शकतो.

शमीने गोलंदाजीला सुरुवातही केली नाही
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक 24 बळी घेणारा 33 वर्षीय शमीने अद्याप गोलंदाजी सुरू केलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली होती, परंतु नंतर घोट्याच्या दुखापतीमुळे त्याला बाहेर पडावे लागले.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून शमी बाहेर असण्याची शक्यता आहे. शमीच्या अनुपस्थितीचे कारण म्हणजे घोट्याच्या दुखापतीनंतर त्याने गोलंदाजी सुरू केलेली नाही. शमीला फिटनेस सिद्ध करण्यासाठी एनसीएमध्ये जावे लागणार आहे. त्यानंतरच निवडीचा विचार केला जाईल.

सूर्यकुमारवर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे
सूर्याने नुकतेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद स्वीकारले. यावेळी त्याच्या घोट्याला दुखापत झाली. याच कारणामुळे तो अफगाणिस्तान मालिकेतून बाहेर आहे. आता बातम्या येत आहेत की सूर्या देशांतर्गत हंगाम आणि आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार याच्यावरही हर्नियाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्याची शस्त्रक्रिया जर्मनीत होणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, सूर्याला स्पोर्ट्स हर्निया आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) बेंगळुरूमध्ये आहे. दोन-तीन दिवसांत तो जर्मनीतील म्युनिक येथे जाईल, तेथे त्याच्यावर उपचार केले जातील. याचाच अर्थ तो यंदा रणजीमध्ये मुंबईकडून खेळणार नाही आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या सामन्यांनाही मुकणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

महामानवांच्या विचारावर आमच्या पक्षाची वाटचाल सुरू असून आमचे व्हिजन क्लीअर आहे – अजित पवार

‘धर्माच्या नावावर द्वेष वाढविला जात आहे, संघाच्या शाखेपासून सोशल मीडियापर्यंत जाणीवपूर्वक या गोष्टी होत आहेत’

Lahu Balwadkar | लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व सोहळा

“येत्या निवडणुकीत तिप्पट नगरसेवक असतील अशी ताकद समीरभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली पक्षात उभी राहिली आहे”