फायनलच्या सामन्यादिवशी शमीच्या आई होत्या रुग्णालयात भरती, आता लेकाला पाहताच…

Mohammed Shami Mother Picture: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी संस्मरणीय असेल. मोहम्मद शमीने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ७ विकेट्स घेत इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात ७ विकेट घेणारा शमी हा एकमेव भारतीय गोलंदाज ठरला.

३३ वर्षीय शमीने या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स (२४) घेतल्या. आता विश्वचषकानंतर मोहम्मद शमी आपल्या घरी परतला आहे. अलीकडेच त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये शमी आणि त्याची आई दिसत आहे. या फोटोसोबत शमीने एक खास कॅप्शनही लिहिले आहे.

मोहम्मद शमीने आईला मिठी मारली
वास्तविक, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आणि लिहिले की आई, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मला आशा आहे की तू लवकर बरी होशील. या फोटोमध्ये मोहम्मद शमी आईला मिठी मारताना दिसत आहे.

अंतिम सामन्यापूर्वी मोहम्मद शमीची आई अंजुम आरा (Anjum Ara) यांना अचानक अस्वस्थता आणि तापामुळे रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले,  टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार त्यांना उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील सहारनपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं. अशा परिस्थितीत आता विश्वचषक 2023 संपला आहे आणि शमी त्याच्या आईच्या जवळ पोहोचला आहे. शमीची आई आपल्या मुलाला भेटल्यानंतर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये खूप आनंदी दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुलांना शाळेतच देण्यात यावे रामायण-महाभारतचे धडे; NCERT पॅनेलची शिफारस

सर्वात प्रथम बोलणारा रोहित भाईच होता…; टीम इंडियातून सातत्याने दुर्लक्षित राहणाऱ्या संजूचा खुलासा

आडनावापुढे पाटील लावता, आर्थिक मागास म्हणता आणि १०० जेसीबीने फुलांची उधळण करता : अंधारे