‘अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी उद्धव ठाकरे उभे राहणार, संजय राऊत प्रचार करणार’, भाजपा नेत्याची टीका

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलं आहे. ठाकरेंच्या या आवाहनानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. अशातच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहे, असं विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी मजेशीर वक्तव्य केले आहे.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची खिल्ली उडवताना मोहित कंबोज म्हणाले, अमेरिकेचे पंतप्रधान उमेदवारीसाठी देखील उद्धव ठाकरे उभे राहणार आहेत. पुढच्या महिन्यात संजय राऊत तिथे जाऊन प्रचार देखील करणार आहेत.

सर्वांना होळीच्या शुभेच्छा. होळी सगळ्यांना सुखाची आणि सुखरूप होळी जाऊदेत. विशेष करून देशाचे लोकप्रिय भावी पंतप्रधान यांना देखिल होळीच्या शुभेच्छा. माझ्याकडे एक पक्की माहिती आहे ती म्हणजे अमेरिकेचे पंतप्रधान उमेदवारीसाठी देखील उद्धव ठाकरे उभे राहणार आहेत. पुढच्या महिन्यात संजय राऊत तिथे जाऊन प्रचार देखील करणार आहेत. उध्दव ठाकरेंना अमेरिकेचे पुढचे राष्ट्रपती बनण्यासाठी शुभेच्छा, अशी खोचक टीका मोहित कंबोज यांनी केली आहे.