महिलेच्या सोबत ‘हा’ आमदार हॉटेल रुममध्ये गेला, पण त्या महिलेच्या नवऱ्याने रंगाचा भंग केला

सूरत : सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल (Viral Video) होतोय. 8 जून रोजी एक आमदार महिलेसोबत हॉटेलमध्ये आला होता. भूपेंद्र भाई ऊर्फ भूपत भाई भयानी असं या आमदाराच नाव आहे. भूपेंद्र भाई सूरतच्या कडोदरा भागातील एका हॉटेलमध्ये विवाहित महिलेसोबत आले होते. आमदाराने महिलेसोबत हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश केला होता. तितक्यात काही वेळात महिलेचा पती तिथे आला.

हा व्हायरल व्हिडिओ सूरतच्या कडोदरा भागतील सूरज गेस्ट हाऊसचा असल्याच म्हटलं जातय. जूनागढच्या विसावदर विधानसभा क्षेत्राचे आमदार भूपत भाई भयानी हॉटेलच्या काऊंटरजवळ उभे असलेले दिसतायत. आजतकने हे वृत्त दिलं आहे.

रजिस्टरमध्ये नोंद केल्यानंतर आम आदमी पक्षाचे आमदार महिलेसोबत गेस्ट हाउसच्या खोलीत गेले. काही वेळाने त्या महिलेचा नवराही गेस्ट हाऊसमध्ये पोहोचतो. आमदार महिलेच्या पतीला पाहताच भूपेंद्रभाई उर्फ ​​भूपत भाई भयानी तोंडाला रुमाल लपवून गेस्ट हाऊसच्या बाहेर धावत आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ 8 जून 2023 चा आहे.

आम आदमी पक्षाचे आमदार भूपेंद्र भाई सुमारे 50 मिनिटे गेस्ट हाउसच्या खोलीत थांबले. खोलीचे 800 रुपये भाडेही त्यांनी भरले होते, मात्र त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा पती गेस्ट हाऊसमध्ये पोहोचताच आमदार महाशय पळून गेले. आम आदमी पक्षाचे आमदार भूपेंद्र भाई यांचा हा सीसीटीव्ही चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.