Gopal Shetty | उत्तर मुंबई लोकसभेसाठी तिकीट नाकारल्यानंतर खासदार गोपाळ शेट्टींची प्रतिक्रिया; म्हणाले….

Gopal Shetty | भाजपाने जाहीर केलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ साठीच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातून २० उमेदवार देण्यात आले आहेत. भाजपाने उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून गोपाळ शेट्टी यांच्याजागी पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर गोपाळ शेट्टी यांनी पक्षाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

शेट्टी (Gopal Shetty ) यांनी म्हटलं की, मला याची जाणीव होती की असा काहीतरी निर्णय होऊ शकतो. पण मी माझं काम करत राहणार आहे. मी कायमचं पक्षासाठी काम करत आलो आहे, मी पैशासाठी पक्षात आलो नव्हतो. त्यामुळं मला पक्षानं ७ वेळा संधी दिली. पण आता मला निवांत वाटतं आहे कारण मोठ्या तणावातून मी मुक्त झालो आहो. कारण खासदार म्हणून पक्षाच्या चौकटीतच काम करावं लागतं होतं.

मला तिकीट नाकारल्यानं काही प्रमाणात माझे कार्यकर्ते नाराज आहेत. पण आता मला त्यांना जास्त वेळ देता येईल, त्यांना भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेता येतील, त्यामुळं आजवर मला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो, असंही गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार