त्या रात्री माही ढसाढसा का रडला? हरभजन सिंगने शेअर केला तो भावूक प्रसंग

Harbhajan Singh On MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) हा आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे. या संघाच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जचे नाते अतूट राहिले आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून कॅप्टन कूल चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा एक भाग असलेला माजी भारतीय ऑफस्पिनर हरभजन सिंगने महेंद्रसिंग धोनीसाठी चेन्नई सुपर किंग्ज किती खास आहे? हे उघड केले आहे. हरभजन सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त हरभजन सिंग आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. आता हरभजन सिंगने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर चेन्नई सुपर किंग्ज आणि महेंद्रसिंग धोनीवरील अनेक अस्पर्शित पैलूंबद्दल सांगितले. IPL 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे 2 वर्षानंतर पुनरागमन झाल्याचे व्हिडीओमध्ये हरभजन सिंग सांगत आहे, मात्र बंदीनंतर चेन्नई सुपर किंग्ज पहिल्यांदाच IPL 2018 मध्ये मैदानात उतरला तेव्हा महेंद्रसिंग धोनीला आपले अश्रू आवरता आले नाहीत.त्या वेळी महेंद्रसिंग धोनीला संघातील अनेक खेळाडूंनी घेरले होते, मात्र त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

 

यानंतर इमरान ताहिर (Imran Tahir) म्हणाला की, आयपीएल 2018 मध्ये टीम डिनर दरम्यान मी जे पाहिले त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. मी नेहमीच ऐकले आहे की पुरुष रडत नाहीत… पण त्या दिवशी मी महेंद्रसिंग धोनीला रडताना पाहिले. तो चांगलाच भावूक झाला होता.