मोदींच्या नेतृत्वावर देशवासियांचा अढळ विश्वास : मुरलीधर मोहोळ

Muralidhar mohol on election results: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वावर देशवासियांचा अढळ विश्वास आहे, यावर या निकालाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. मोदींवर कॅांग्रेसने (Congress) अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. ही टीका देशवासियांना रुचली नाही, हे या निकालाने सिद्ध झाले आहे.

मोदींच्या गरीब कल्याणाच्या आणि विकासाच्या अजेंड्यापुढे कॅांग्रेसचा खोट्या आश्वासनांचा अजेंडा निष्प्रभ ठरला आहे. या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक घटकाचे मनापासून अभिनंदन. देशातील मतदारांचा हा ट्रेंड पुणे लोकसभेतही कायम असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी उत्सुक आणि सज्ज आहोत’, अशी प्रतिक्रिया भाजपा पुणे लोकसभा निवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी- धीरज घाटे

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलून काँग्रेसच विजयी होईल – नाना पटोले

मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा