उदय सामंत हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या शहरप्रमुखांसह 6 जणांना अटक

पुणे – पुण्यात राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Former Higher and Technical Education Minister Uday Samant) यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली आहे. आमदार यावेळी शिवसैनिकांकडून ”गद्दार-गद्दार” अशी घोषणाबाजीही करण्यात आली. पुण्याच्या कात्रज परिसररात ही घटना घडली आहे.(shiv sainik attacked on rebel eknath shinde group mla uday samant van at pune).

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला.या हल्ल्या प्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक केली आहे. तसंच मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांना अटक केली आहे. राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांनाही अटक केली असून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.