‘आसाममध्ये मुस्लिम आणि हिंदू शांततेने राहत आहेत, मात्र काँग्रेस सरकारच्या काळात…’

Himanta Biswa Sarma: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, त्यांना सध्या मुस्लिमांची मते नको आहेत, कारण आमचे नाते याच्या वरचे आहे. भाजप नेते सरमा म्हणाले, आसाममध्ये मुस्लिम आणि हिंदू शांततेने राहत आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात मी मंत्री होतो तेव्हा चुकीच्या धोरणामुळे दर चार-पाच वर्षांनी जातीय संघर्ष व्हायचा, पण २०१४ पासून आसाममध्ये पूर्ण शांतता आहे.

एनडीटीव्हीशी बोलताना ते म्हणाले, आदिवासी बंडखोर संघटना एकामागून एक मुख्य प्रवाहात येत आहेत. राज्यात हिंदू-मुस्लिम शांततेत राहतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा मी दिल्लीत मदरसे बंद करू म्हणतो, तेव्हा याचा अर्थ मुस्लिम मुला-मुलींना डॉक्टर व्हायला हवे. आपल्या राज्यात मेडिकलच्या 1200 जागांपैकी 380 जागांवर मुस्लिम मुले-मुली आहेत.

काय म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?

अशा स्थितीत आसाममधून भाजपला सर्वाधिक मुस्लिम मते मिळणार आहेत का?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, सध्या आम्हाला मुस्लिमांची मते नको आहेत, विशेषत: बंगाली मुस्लिमांची मते. सर्व समस्यांचे मूळ कारण मते आहेत. काँग्रेसला मतांची गरज होती. यामुळे त्यांनी रस्ते, शाळा, महाविद्यालये बांधली नाहीत. तसेच वीज व घर दिले नाही.

माझे मुख्य तत्त्व हे आहे की मला तुमचे मत नको आहे. मला तुमच्या क्षेत्राचा मुस्लिमबहुल क्षेत्र पुढील दहा वर्षे विकास करायचा आहे. बालविवाह संपवण्यासाठी, मुस्लीम मुलींनी शाळा-कॉलेजात जावे याची मला व्यवस्था करावी लागेल. हे काम पुढील 10 ते 15 वर्षे करायचे आहे. त्यानंतर मी जाऊन मते मागणार आहे.

सरमा यांनी सांगितले की 2020 च्या निवडणुकीत त्यांनी अशी भूमिका घेतली होती की जेव्हा आदर्श आचारसंहिता लागू होईल तेव्हा मी त्यांच्या भागात (मुस्लिमबहुल क्षेत्र) जाणार नाही. निवडणूक जिंकल्यानंतर येईल. यावेळीही मी लोकसभा निवडणुकीपूर्वी तेच म्हणत आहे  .