नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता;शासन निर्णय निर्गमित

Namo Shetkari Mahsnman Nidhi Yojana –  प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित झाला आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde)  यांनी दिली.

सन २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषित केली होती. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये ६००० या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी ६००० इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्माननिधी ही योजना राबवण्यास जून २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीच्या पहिल्या हप्तापोटी १७२० कोटी इतका निधी वितरित करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे.

निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून गतीने सुरू आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत, असेही शेवटी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया