जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे समूळ उच्चाटन करा – नाना पटोले

nana patole

पालघर : काँग्रेसचा विचार हाच देशाला, संविधानाला व सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा आहे. काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे परंतु भारतीय जनता पक्षाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही. भाजपाने देश विकायला काढला असून डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी दिलेले संविधानही बदलण्याचा घाट घातला आहे, अशा भाजपाचे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समूळ उच्चाटन करा, असे आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त पालघर जिल्ह्यातील प्रचार सभेत पटोले बोलत होते. पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाची संकल्पना मांडून जिल्हा निर्मितीचा निर्णय घेतला, त्यासाठी जादा निधीही दिला. आजही काँग्रेस पक्ष पालघरच्या विकासासाठी कट्टीबद्ध आहे.

सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची आहे. भाजपा सरकारच्या काळात आदिवासींसाठी असलेली खावटी योजना जाणीवपूर्वक बंद करण्यात आली होती ती मविआ सरकारने पुन्हा सुरु केली. भाजपाने गरिबांना मोफत गॅस देण्याच्या नावाखाली उज्ज्वला योजना आणली आणि रॉकेल बंद केले. आता गॅस ९०० रुपये झाला, एवढा महाग गॅस गरिबांना परवत नाही त्यामुळे उज्ज्वला योजना ही शोभेची वस्तु बनून राहिली आहे.

यापुढे ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्यांना बीपीएल योजनेचा फायदाही घेता येणार नाही, हा भाजपाचा डाव आहे. सामान्य जनतेला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे, त्यांचे हक्क व अधिकार अबाधित राहिले पाहिजेत यासाठी काँग्रेस नेहमी आदिवासी, वंचित व सामान्य जनतेच्या पाठीशी उभी रहिलेली आहे व यापुढेही उभी राहिल.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस विजय पाटील, प्रदेश सचिव मनिष गणोरे, पालघर जिल्हा अध्यक्ष दिवाकर पाटील, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष रफीक भुरे किसान काँग्रेसचे पराग पाष्टे, पालघरचे सहप्रभारी संतोष केणे आदी उपस्थित होत.

दलित पँथरचा काँग्रेसला पाठिंबा…

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्या पोटनिवडणुकीसाठी दलित पँथरने काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यातील मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची असल्याने पाठिंबा देत असल्याचे दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी पाठिंबा पत्रात म्हटले आहे.

हे वाचलंत का ? 

Previous Post
cm thackeray

मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय !

Next Post
aaditya thackeray

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस भेट

Related Posts
भारतीय फलंदाजांची टी२०त ऐतिहासिक कामगिरी, Indian players साठी असे राहिले २०२३ वर्ष

भारतीय फलंदाजांची टी२०त ऐतिहासिक कामगिरी, Indian players साठी असे राहिले २०२३ वर्ष

Team India T20 Cricket Records: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी (Team India) 2023 वर्ष अविस्मरणीय ठरले. टीम इंडियाला यंदा आयसीसी…
Read More
op soni

पंजाबच्या उपमुख्यमंत्र्यांना भाजपा कार्यकर्त्यांचा घेराव; ‘मोदी झिंदाबाद’च्या घोषणा देण्यास भाग पाडले

फिरोजपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींनंतर आता पंजाबमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या संतापामुळे या…
Read More
पोलिसांवर दवाब टाकला नाही, अमित शहांनाही बोललो नाही; मुलाच्या हिट अँड रन प्रकरणावर बावनकुळेंची प्रतिक्रिया | Chandrashekhar Bawankule

पोलिसांवर दवाब टाकला नाही, अमित शहांनाही बोललो नाही; मुलाच्या हिट अँड रन प्रकरणावर बावनकुळेंची प्रतिक्रिया | Chandrashekhar Bawankule

नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे  (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे याचा सहभाग असल्याने…
Read More