… म्हणून यंदा जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं आहे; नानांनी सांगितले नेमके कारण 

Karnataka Election Results : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या  ट्रेंडनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा ओलांडला आहे असून भाजप खूपच मागे आहे. भाजप- 68, काँग्रेस- 137, जेडीएस- 17, इतर- 2 अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार कर्नाटकात काँग्रेस 44 जागांवर तर भाजप 23 जागांवर पुढे आहे. तर जेडीएस ७ जागांवर आघाडीवर आहे.

या निकालानंतर कॉंग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण असून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची यावर प्रतिक्रिया आली आहे.ते म्हणाले,  परिवर्तन सुरू होत आहे. यावेळी जवळपास ४५ टक्के मतदान काँग्रेसला होणार आहे. त्यामुळे काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल. मागच्यावेळी काँग्रेसला जनतेने कौल दिला आणि त्याचाच फायदा घेऊन मोदी सरकारने जनतेच्या कौलाविरोधात जाऊन सरकार स्थापन केलं. भाजपा लोकशाही न मानणारा पक्ष आहे. त्यामुळे यंदा जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं आहे.