किती वेळ बोलतो मी मर्द आहे, एकदा तपासावेच लागेल; नारायण राणे यांची ठाकरेंवर टीका

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानावर मुंबईतील गटप्रमुखांना संबोधित केलं. विराट मेळाव्यात त्यांनी भाजप, राज ठाकरे आणि शिंदे गटावर कडाडून हल्ला चढवला. गटप्रमुखांच्या मेळाव्यातूनच दसरा मेळाव्याआधीचा ‘ट्रेलर’ दाखवून मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंगही फुंकलं. उद्धव ठाकरे यांच्या याच भाषणाचा पंचनामाकरण्यासाठी नारायण राणे यांनी मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे चांगलेच आक्रमक झाले होते.

किती वेळ बोलतो मी मर्द आहे, एकदा तपासावेच लागेल असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर टीका केली आहे. उद्धव ठाकरे नेहमी आपल्या भाषणात मी मर्द आहे, मी मर्द आहे असं म्हणतात. पण एक तरी मर्दासारखा काम केलं आहे का? असा सवाल उपस्थित करत सगळी काम दुसऱ्याकडून करून घेता अशी टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

आदिलशाह आणि अमित शाह यातील फरक कळत नाही ? ते लोकं आपल्यावर चालून आले. गृहमंत्री देशाचे आहेत. त्यांना गिधाड बोलताना लाज वाटली नाही का ? पण लांडगा उपकाराची जाणीव ठेवत नाही असा वार राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला.