शिक्षिकेचा शाळा मालकावर बलात्काराचा आरोप; म्हणाली, गेले अनेक दिवस तिच्यावर…

Crime News – उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर (Gautam Buddha) जिल्ह्यात एका शिक्षिकेने आपल्याच शाळेच्या मालकावर (School Owner) बलात्काराचा खळबळजनक आरोप केला आहे. आरोपीने पती आणि मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने म्हटले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नोएडाच्या बीटा-2 पोलीस स्टेशन परिसरातील एका शाळेतील शिक्षिकेने  तिच्या मालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.पीडितेने आरोप केला आहे की, शाळेच्या मालकाने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला आहे आणि तो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन अनेक दिवस तिच्यावर बलात्कार करत आहे.

बीटा-2 पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक विनोद कुमार मिश्रा यांनी सांगितले की, पोलिसांना दिलेल्या तक्रारीत ग्रेटर नोएडा येथील रहिवासी असलेल्या शिक्षिकेने आरोप केला आहे की, शाळेच्या मालकाने तिला 20 फेब्रुवारीला शाळेच्या कॅम्पसमध्ये बोलावले होते. त्यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनुसार, शाळेच्या मालकाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला . पीडितेच्या तक्रारीचा हवाला देत पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने या घटनेचा व्हिडिओही बनवला आहे.

शाळेच्या मालकाने तिच्यावर सामूहिक बलात्कार आणि पोलिसात तक्रार केल्यास मुलगा आणि पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी अनेक दिवसांपासून आपल्यावर बलात्कार करत असल्याचा दावा महिलेने केला आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने शुक्रवारी रात्री बीटा-2 पोलीस ठाण्यात शाळा मालक मोहित नगर याच्याविरुद्ध बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

https://youtube.com/shorts/LLrVrVQpCd4?si=eqsX7Qv1NCTZNyMe

महत्त्वाच्या बातम्या-

World Cup 2023: एक असा खेळाडू, जो स्वबळावर टीम इंडियाला बनवू शकतो विश्वविजेता

Rohit Pawar : सूड कसा उगवायचा याचा निर्णय…; ‘बारामती ॲग्रो’ प्रकरणी रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ram Satpute : लोकसभेसाठी सोलापूरमधून राम सातपुते ? शेतकऱ्यांचा, युवकांचा बुलंद आवाज आता दिल्लीत घुमणार ?