जे लोक मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत तेच आज मराठा समाजामध्‍ये फूट पाडत आहेत

Maratha Reservation – मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी जमाव हिंसक होऊन जाळपोळ करत असल्याचं समोर येत आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर राज्यभरातील ९० पेक्षा जास्त एसटी बसची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. त्यात एसटीचे कोट्यवधींचे नुकसान झाले. दुसरीकडे या जाळपोळीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केले. तसेच आंदोलनाला गालबोट लागेल अशी कृती कुणी करू नये, असं आवाहन केलं.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एक लक्ष्यवेधी ट्वीट केले आहे. मराठा आरक्षणाच्‍या आंदोलनात मराठा तरुणांनी आत्‍महत्‍या करु नयेत. हिंसेच्‍या मार्गाला जाऊ नये.असं आवाहन त्यांनी केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे सर्वांनाच वाटते. अनेक वेळा मुख्‍यमंत्री पदावर राहूनही आणि अडीच वर्षे मुख्‍यमंत्री पदावर राहूनही जे लोक मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत तेच आज महाराष्‍ट्रात मराठा समाजामध्‍ये फूट पाडत आहेत. राज्‍याचे वातावरण बिघडवित आहेत. यासंबंधीची दखल तपास यंत्राणा घेतील असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेचा सवाल

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

झिरो Subscribers सोबतही You Tubeवरुन कमवा पैसा, ही एक ट्रिक तुम्हाला बनवेल मालामाल!