पिंपरी चिंचवडमध्ये वेश्याव्यसायाचा काळा धंदा, प्रसिद्ध अभेनेत्रीची दलदलीतून सुटका

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये मागच्या काही दिवसांपासून काळे धंदे आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. आता पिंपरी चिंचवडमधून अजून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने तिघी जणींची देह व्यापाराच्या रॅकेटमधून सुटका केली आहे.

छत्तीसगडच्या अभिनेत्रीकडून पिंपरी चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचा आरोप आहे. या अभिनेत्रीसह आणखी दोन महिलांची सुटका करण्यात आली. दोन दलालांना पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई ताथवडे येथील साई लॉजवर करण्यात आली.

छत्तीसगडच्या अभिनेत्रीकडून पिंपरी चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर ताथवडे येथील साई लॉजवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा लावला. त्यानंतर लॉजवर छापा मारुन कारवाई करण्यात आली.

आरोपी मोबाईलवरुन व्हॉट्सअॅप कॉल करुन वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवण्याचे काम करत होते. संबंधित मुली त्यांच्या नावावर हॉटेलमध्ये रूम बुक करत असत. या दलदलीतून छत्तीसगडच्या अभिनेत्रीसह आणखी दोन महिलांची सुटका करण्यात आली. दोन दलालांना पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.